Complaint सकाळच्या वेळात जलद लोकल्स ची संख्या वाढवणे.

  • Mumbai Local Train Complaint & Customer Care Number - सकाळच्या वेळात जलद लोकल्स ची संख्या वाढवणे.
    Vikrant on 2022-02-26 19:18:42

    सकाळच्या वेळी डोंबिवली स्थानकातील फलाट क्र. 5 वरुन 9:25 ची जलद लोकल गेल्यावर जवळपास 30 मिनिटे एकही जलद लोकल उपलब्ध नसते. थेट 9:55 ची 15 डब्यांची दादर लोकल आहे. या अर्ध्या तासामध्ये फलाट क्र. 3 वर प्रचंड गर्दी होते आणि गाडीत चढायला अजिबात जमत नाही. डेक्कन क्वीन, पंचवटी इ. एक्सप्रेस बाजूला 5 वी आणि 6 वी मार्गिका उपलब्ध होऊनही अजूनही फलाट क्र. 5 वरूनच सोडतात. जर या एक्सप्रेस नवीन मार्गिकेवरून सोडल्यास 9:25 ते 9:55 या अर्ध्या तासात किमान पाच मिनीटांच्या अंतराने का होईना कमीतकमी 15/12 डब्यांच्या पाच-सहा जलद लोकल सोडल्यास लोकल मधील गर्दी बऱ्यापैकी आटोक्यात येऊन लोकल मधली धक्काबुक्की, भांडणे, मारामाऱ्या बंद होऊन सर्वांना सुरक्षित प्रवास करता येईल.