Complaint विषय :- संचिका क्र. के 66 कोपरीपाडा सेक्टर २६ ए वाशी नवी मुंबई हि मूळ संचिका (अग्रीमेंट - फाईल) सिडको कडून मिळणे बाबत न मिळण्यास, मी सिडको भवनमध्ये विष घेऊन आत्महत्या करेन , व यास जबाबदार सिडकोचे प्रश

  • City & Industrial Development Corporation [CIDCO] Customer Care, Complaint and Reviews - विषय :- संचिका क्र. के 66 कोपरीपाडा सेक्टर २६ ए वाशी नवी मुंबई हि मूळ संचिका (अग्रीमेंट - फाईल) सिडको कडून मिळणे बाबत न मिळण्यास, मी सिडको भवनमध्ये विष घेऊन आत्महत्या करेन , व यास जबाबदार सिडकोचे प्रश
    Arun Kashinath Mumbaikar on 2018-10-25 21:35:21

    दिनांक :- २५/१०/२०१८

    प्रति,
    मा. व्यवस्थापकीय संचालक साहेब,
    दुसरा मजला , सिडको भवन
    सी.बी.डी बेलापूर ,
    नवी मुंबई ४००६१४

    अर्जदार :- श्री. अरुण काशिनाथ मुंबईकर मु.पो. चिरनेर ता. उरण जि. रायगड यांच्या कडून.

    विषय :- संचिका क्र. के 66 कोपरीपाडा सेक्टर २६ ए वाशी नवी मुंबई हि मूळ संचिका (अग्रीमेंट - फाईल) सिडको कडून मिळणे बाबत न मिळण्यास, मी सिडको भवनमध्ये विष घेऊन आत्महत्या करेन , व यास जबाबदार सिडकोचे प्रशासन राहील.

    महोदय,
    साहेब उपरोक्त विषयान्वये संचिका क्र. के ६६ कोपररीपाडा सेक्टर २६ ए वाशी नवी मुंबई दिनांक :- ०८/११/२०१६ रोजी माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अन्ववे सदर संचिकेतील कागतपत्रे मिळावी या साठी अर्ज केला, त्या वेळी वसाहत विभाग शहर सेवा २ पहिला मजला सिडको भवन येथे चौकशी केली असता तेथील सिडकोचा कर्मचारी श्री. विशाल भगत मला म्हणाले की काका सदर फाईल तुम्हाला मी एक महिन्यांपूर्वी दिली परत तीच फाईल माझ्याकडे का मागता. त्या वेळी मी म्हणाले की सदर फाईल मधील कागदपत्रे तुम्ही मला दिली नाहीत म्हणून त्या वेळी संबंधित वसाहत विभागाचे आधिकारी श्री. कडू साहेब यांना भेटलो असता त्यांने सिडकोचे कर्मचारी श्री. सोमनाथ कोळी यांच्या कडे चौकशी केली असता ते म्हणाले साहेब के ६६ फाईल हि जुहू गांवच्या फाईल ला अटेच आहे. तेव्हा कडू साहेबांनी सोमनाथ कोळी ला सांगितले की यांची फाईल शोधून दोन दिवसांत त्यांना देऊन टका? परंतु आज गेली दोन वर्षे झाली तरि सदर फाईल सिडको कडून मिळत नाही म्हणून राज्य माहिती आयोग कोकण भवन यांच्या मी माहिती अधिकाराच्या अपिलात जाऊन त्यांचे अपिल क्र. के. आर ३५३८/२०१७ च्या दिनांक :- १४/०५/२०१८ च्या आदेशानुसार आपल्या मार्फत त्रिदीय समिती स्थापन झाली व श्री. पी. बी. राजपूत साहेब अतिक्रमण विभाग रायगड भवन, यांच्या पथकाने के ६६ कोपररीपाडा सेक्टर २६ ए वाशी नवी मुंबईचा भूखंड क्र. १७० वरिल इमारतीस साईट व्हिजिट देऊन तेथील शेतकरी, मालक व विकसक यांच्या कडून संभधीत कागदपत्रे हस्तगत केली आहेत. आणि तीच कागतपत्रे सिडकोचे आधिकारी मला तसेच राज्यमाहिती आयोगास देणार आहेत असे समजते, परंतु मूळ संचिका के ६६ हि सिडको कडून हरवली गहाळ झाली असे दिनांक :- १४/०९/२०१८ च्या श्री. एम. एस. चौरे यांच्या पत्रात वरिल भूखंड क्र. १७० ची माहिती या विभागास उपलब्ध नाही, असे समजते मग मूळ संचिका के ६६ सिडको कडून गहाळ झाली की एखाद्या सिडकोच्या कर्मचाऱ्यांने अधिकाऱ्याने गायब केली याचा मला सवंशय आहे. कारण माझे सासरे कै. बाळकृष्ण कळू भोईर यांचे निधन दिनांक :- ०८/०५/२०१६ रोजी झाले त्या नंतर जमिनीचे सावकार श्री. अरविंद जगन्नाथ महाजन व कूळ श्री. बाळकृष्ण कळू भोईर यांचे सुमारे १८००/ चौ. मी. चे. भूखंड सिडकोने २००८ ते २०१० च्या कालावधीत कोणाला दिले करण माझी पत्नी सौ. कमल अरुण मुंबईकर हि बाळकृष्ण कळू भोईर याची मुलगी आहे मग वारस म्हणून तीचे सह्या , अंगुठे कोणी तरि खोटे करून माझे मेहुणे विकासक, सिडकोचे आधिकारी यांनी गडबड केल्याचे मला वाटत आहे, सदर के ६६ हि मूळ फाईल मला मिळावी हि विनंती आज दोन अडीच वर्षे सिडको चे आधिकारी मला थूक लावत आहेत असे मला वाटते आता माझा संयम मर्यादा संपली असून आमच्या न्याय हक्कासाठी मी व माझी पत्नी दोघे मिळून आपल्या सिडकोच्या कार्यलयास सामूदायीक विष पिऊन आत्महत्या करू - सांगत पत्रकारांना घेऊन येतो आणि पुढील होणाऱ्या अनर्थास सिडको प्रशासनच जबाबदार राहील याची आपण गंभीर नोंद घ्यावी, कारण मी गेली दोन अडीच वर्षे मी सातत्याने सिडकोचे आधिकारी श्री. जगदीश राठोड, सुनील तांबे, कडू साहेब, विशाल भगत, सोमनाथ कोळी, त्यानंतर श्री. अजिक्य पडवळ, किरण घरत, मोरे साहेब, एस. एम. चौरे, श्री. डोळस साहेब, यांना यांच्यासी संपर्क आहे तुम्हाला भेटण्यास सिडको भवन येथे मी दोन तीन वेळा प्रयत्न केले परंतु श्री. डोळस साहेब, यांनी मला भेटू दिले नाही, म्हणून मी तसेच मा. ना. मुख्यमंत्री महोदय साहेब, मा. ना. पंतप्रधान साहेब, मा. ना. राष्ट्रपती साहेब, मा. ना. आणा हजारे साहेब यांना या फाईलची ऑनलाईन तक्रार केली आहे हे कळावे हि विनंती.

    आपला विश्वासू


    ( श्री. अरुण काशिनाथ मुंबईकर )
    भ्रमणध्यनी ८६५५२४३४२७