Complaint निवडणुकीत अपात्र तीन उमेदवारांना पात्र केल्याबाबत

  • City & Industrial Development Corporation [CIDCO] Customer Care, Complaint and Reviews - निवडणुकीत अपात्र तीन उमेदवारांना पात्र केल्याबाबत
    राजेंद्र बापूराव जगताप on 2018-09-12 22:20:27

    प्रति,
    मा.आयुक्त /सचिव, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण,पुणे,महाराष्ट्र राज्य.

    सन्माननीय साहेब,
    मी, श्री राजेंद्र बापूराव जगताप एस-201 वृन्दावन (जी+3) सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या, प्लॉट-52, सेक्टर-9, खांदा कॉलनी, नवीन पनवेल (प)- 410 206 या संस्थेत राहतो व सदर संस्थेचा मी सभासद आहे व सदर संस्थेत एकूण 357 सभासद आहेत. सदर संस्थेची नोंदणी सन 2006 मध्ये झाली.

    मी आपणांस कळवू इच्छितो की, सदर संस्थेत सहकार वर्ष 2006-2007 ते सन 2016-2018 पर्यंत एकच संचालक मंडळ कार्यरत होत. सदर संस्थेच्या संचालक मंडळात सन 2006 ते मार्च 2018 पर्यंत श्री सुहास बाबुराव नलवडे आणि श्री संदीप भिवा वीर सतत बारा वर्षे संचालक म्हणून कार्यरत होते.

    संस्थेची सन 2017-2018 ते सन 2022-2023 या पाच वर्षांच्या कालावधीसाठी संचालक मंडळासाठी सहनिबंधक सहकारी संस्था (सिडको), रायगड भवन, तिसरा मजला, सी बी डी बेलापूर, नवी मुंबई यांच्या अधिपत्याखाली दि 25/03/2018 रोजी निवडणूक झाली.

    तरी निवडणूक नियमानुसार ज्या सभासदांना सन 2002 नंतर तिसरे अपत्य असेल तर तो सभासद निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून अपात्र असेल व निवडणूक लढवू शकत नाही.

    परंतु श्री सुहास बाबुराव नलवडे आणि श्री संदीप भिवा वीर या दोन्ही सभासदांना सन 2007 नंतर तिसरे अपत्य असूनसुद्धा त्यांनी निवडणूक कार्यालयास फक्त दोनच अपत्य असल्याची माहिती देऊन निवडणूक प्राधिकरणाची फसवणूक व दिशाभूल करून आणि कायद्याचे उल्लंघन करून निवडणुकीत विजयी झाले आणि सध्या ते संचालक मंडळात बेकायदेशीरपणे कार्यरत आहेत. संचालक मंडळातील सर्व सदस्यांना याबाबत माहिती असूनसुद्धा त्यांना पाठीशी घालून अभय देत आहेत. संचालक मंडळात एकूण 17 सद्स्य आहेत तरी याबाबत सर्व संचालकांची सही असलेले शपथपत्र घ्यावे अशी माझी विनंती आहे.

    सदर तीन अपत्यांबाबतची तक्रार अर्ज निवडणूक दिनांकापूर्वी आणि निवडणुकीनंतर निवडणूक निर्णय अधिकारी, सहनिबंधक सहकारी संस्था (सिडको), सी बी डी बेलापूर, रायगड भवन, तिसरा मजला, नवी मुंबई आणि आयुक्त/सचिव, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, पुणे आणि सहकार आयुक्त व निबंधक, पुणे याना वारंवार भ्रमणध्वनीद्वारे तोंडी आणि लेखी काळवूनसुधा संबंधीत प्राधिकार्यांनी कोणतीही कार्यवाही केलेली दिसत नाही व याबाबत मला अद्यापपर्यंत काहीही लेखी कळविले नाही.

    मी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सेवेत कार्यरत असून माझी तीन अपत्यांबाबतची तक्रार खरी आहे. जर माझी तक्रार आपणांस खोटी वाटत असेल तर माझ्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि कायद्याने कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.

    तरी माझी आपणांस कळकळीची विनंती आहे कि सदर तक्रारीबाबत आपल्या कार्यालयामार्फत सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी किंवा C I D अथवा C B I मार्फत चौकशी करून मला न्याय देण्यात यावा ही विनंती.

    खालील तीन संचालकांनी सन 2007 नंतर तिसरे अपत्य असूनसुद्धा दोनच अपत्य असल्याची माहिती दिली आहे.
    1) श्री सुहास बाबुराव नलवडे- सदनिका क्र U-02
    2) श्री संदीप भिवा वीर- सदनिका क्र S-301
    3) श्री नितिन राजाराम वाघमारे- सदनिका क्र G-201

    वरील सभासदानपैकी श्री सुहास बाबुराव नलवडे हे केंद्र सरकारी सेवेत आहेत आणि श्री नितिन राजाराम वाघमारे हे राज्य सरकारी सेवेत कार्यरत आहेत. तरी सदर सभासदानी शासकीय सेवेत असूनसुद्धा खोटी माहिती देऊन कायद्याचं उल्लंघन केलेलं आहे.

    तरी मी पुन्हा आपणांस विनंती करतो की सदर बाबत निष्पक्ष चौकशी व्हायला पाहिजे. अन्यथा मला नाईलाजाने खलील नमूद केलेल्या प्राधिकाऱ्यांस कळवावे लागेल.

    1. मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
    2. मा. सहकारमंत्री, महाराष्ट्र राज्य.
    3. मा. लोकायुक्त, महाराष्ट्र राज्य.
    4. मा. पोलीस आयुक्त, नवी मुंबई व मुंबई.
    5. मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खांडेश्वर पोलीस ठाणे 6. मा.राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र राज्य
    7. मा. मुख्य निवडणूक आयुक्त, दिल्ली
    8. मा. पंतप्रधान कार्यालय, दिल्ली.

    कळावे.

    आपला विश्वासु,

    रा.बा. जगताप

    श्री. राजेंद्र बापूराव जगताप

    प्रत रवाना
    सहनिबंधक सहकारी संस्था, सिडको,बेलापूर, रायगड भवन, तिसरा मजला,नवी मुंबई