Complaint हे तर काहीच नाय

  • Zee TV Contact Phone Number, Office Address, Email & Suppor - हे तर काहीच नाय
    Raju Naik on 2021-12-17 23:05:49

    महोदय,

    नुकताच सुरू झालेला हे तर काहीच नाय ह्या कार्यक्रमाचा पहिलं भाग पहिला. कार्यक्रम एकदम रटाळ आणि कंटाळवाणा वाटला.
    कलाकारांनी शेयर केलेले किस्से एकदम चालू म्हणजे आपल्या अवतिभोवती नेहमी घडणार्‍यापैकी वाटले. किस्से ऐकून हसावे की रडावे
    ते कळेना. कार्यक्रमात कॉटन किंग ची एकच जाहिरात होती बाकी आपण आपल्या मालिकेच्या जाहिराती दाखवल्या. म्हणजे कमर्शियल
    दृस्त्या ही चांगला प्रतिसाद नाही. आपले नावलौकिक असणारे फार मोठे चॅनेल आहे.मनोरंजन विश्वात आपला दबदबा आहे., मग असे
    रटाळ आणि बालिश कार्यक्रम सुरू ठेवून आपण प्रेक्षकांचा अंत पाहू नका. नाहीतर प्राइम स्लॉट मध्ये आपला प्रेक्षक वर्ग कमी होईल.
    एक प्रेक्षक म्हणून माझी ही कळकळीची विंनंती आहे. कार्यक्रम आटोपता घेवून एखादा चांगला कार्यक्रम आणा.

    मी आपल्या वहिनीचा दहा पंधरा वर्षापासूनचा जुना प्रेक्षक आहे . रोखठोक व्यक्त झाल्यामुळे क्षमस्व !

    आपला,
    राजू वा. नाईक
    ____________________________________________________________
    "ऋणानुबंध", १५६ / नाळा, श्रीखंडी वाडी , सोपारा नाळा रोड, पोस्ट - सोपारा, तालुका : वसई ,
    जिल्हा : पालघर , नालासोपारा ( प ) - ४०१२०३, भ्रमण ध्वनी : ९०११८३५४७१
    ई मेल : : naikraju06@gmail.com,