Complaint विषय:- नेहरू चौक येथील महानगरपालिका च्या जागेवरील अतिक्रमण टपऱ्या काढण्या बाबत

  • Shiv Sena Contact Number, Email ID, Office Address, Complaint And Review - विषय:- नेहरू चौक येथील महानगरपालिका च्या जागेवरील अतिक्रमण टपऱ्या काढण्या बाबत
    vikas gosavi on 2021-07-17 15:32:52

    महोदय

    माननीय श्री मुख्यमंत्री साहेब

    माननीय आयुक्त साहेब

    विषय:- नेहरू चौक येथील महानगरपालिका च्या जागेवरील अतिक्रमण टपऱ्या काढण्या बाबत

    आम्ही तिळभांडेश्वर लेन मधील रहिवासी विनंतीपूर्वक सांगू इच्छितो की नेहरू चौक येथे स्मार्ट सिटी रस्त्याचे काम चालू आहे आम्हाला मुख्य रस्त्याकडे जाण्या-येण्यासाठी रस्ता नाही फोडलेला रस्ता कधी नवीन तयार होईल याची शास्वती नाही तरी आमची विनंती आहे की फोडलेल्या रस्त्याला समांतर नेहरू चौकातील अतिक्रमण टपऱ्या काढून गंगेकडे जाणारा रस्ता बनवल्यास आम्हा तिळभांडेश्वर गल्लीतील रहिवाशी जनतेला जाण्या-येण्यासाठी रस्ता तयार होईल गल्ली मध्दे कोणाच्या घरास आग लागल्यास आग्निशामकचा पाण्याचा बंब कसा येईल किंवा अॅबुलन्स कशी येईल याचा जरुर विचार करून अतिक्रमण टपऱ्या बाबत तातडीने कारवाई करूण काढण्यात याव्या व समातंर रत्ता बनवावा हि विनंती

    मी संजय सिताराम देव माझे लग्न समारंभासाठी भाड्याने भांडी देण्याचा व्यवसाय आहे सध्या तिळभांडेश्वर लेन मध्ये चार चाकी टेम्पो किंवा कुठलीही गाडी येत नाही त्यामुळे माझे अतोनात नुकसान होत आहे तसेच चालण्यासाठी सुद्धा दोन फूट जागेतून जावे लागते कित्येक जण तर खनलेल्या रस्त्यात खाली पडून जखमी झालेले आहे तरी चौकातील महानगरपालिकेच्या जागेवरील अतिक्रमण टपऱ्या काढल्यास रस्ता तयार होईल मागे माननीय आयुक्त साहेब श्री तुकाराम मुंडे यांनी ह्या टपऱ्याचा सर्वे करून त्यावर लाल रंगाच्या फुल्या मारून हे अतिक्रमण काढण्याबाबत अतिक्रमण विभागाला कळवले होते परंतु त्यांची बदली होताच अतिक्रमण विभागातील संबंधित अधिकारी यांनी पुढे कुठलीही कारवाई केली नाही

    मी विकास गोसावी माझ्या तर घराला लागूनच रस्त्याचे खोदकाम करून ठेवले आहे आम्हाला तर घरातून बाहेर पडतांना जीव मुठीत धरून बाहेर जीवनावश्यक वस्तू औषध आणण्यासाठी जावे लागते मागे ०२ जानेवारी २०२१ रोजी मी ऑनलाइन तक्रार केलेली आहे तरी काही संबंधित अतिक्रमन चे अधिकारी यांच्या कृपा आशीर्वादाने अजून अतिक्रमण टपऱ्या काढण्यात आलेल्या नाही तरी कृपया लवकरात लवकर अतिक्रमण काढण्यात यावे ही विनंती

    मी अवधूत पिंपळे माझे पण घर दुकान रस्त्याला लागूनच आहे सध्या माझ्या दुकानासमोर चार फूट रस्ता खंदुन ठेवला आहे माझ्या आईची तब्येत अचानक ऑक्सिजन लेबल कमी होऊन रात्रीच्या वेळी तब्येत बिघडली परंतु माझ्या घराजवळ एवढे मोठे खोदकाम करून ठेवल्यामुळे कुठलेही वाहन येण्या-जाण्यासाठी रस्ताच नसल्याकारणाने साधी रिक्षा सुध्दा आनता आली नाही त्यामुळे माझ्या आईचे दुःख निधन झाले व मी माझ्या आईवर दवाखान्यात नेऊन उपचार करू शकलो नाही याला स्मार्ट सिटी कंपनी का नाशिक महानगरपालिका कोण जबाबदार आहे तरी कृपया डीपी रोड प्रमाणे पंधरा मीटरचा रस्ता होणे खूप गरजेचे आहे तरी कृपया यापुढे कोणाचीही आई किंवा नातेवाईक यांच्यावर असा दुःखद प्रसंग येऊ नये म्हणून १५ मीटर रस्ता होणे खूप गरजेचे आहे ही विनंती .

    मुख्यमंत्री साहेब आपण यावर लवकरात लवकर कारवाई करून ही समस्या सोडवावी आणि संबंधित अधिकारी यांचे तात्काळ निलंबन व बदली करण्यात यावी जेणेकरून शिस्तबद्ध अधिकारी यांची नेमणूक होऊन नियमात आणि व्यवस्थित काम लवकरात लवकर पूर्ण होईल जेणेकरून नाशिकचे जनतेला समस्या पासून मुक्त का भेटेल सोनार समाज शिंपी समाज मारवाडी समाज क्षत्रिय समाज गाडी लोहार समाज तांबट समाज या परिसरातील लोकांना त्रास होतो आहे .

    आमचे सर्वांचे हीच आशा आहे आपण यावर योग्य तो निर्णय लवकरात लवकर घेण्यात येईल .



    १)संजय देव

    २)विकास गोसावी

    ३)अवधूत पिंपळे