Complaint धरण कामाविषयी

  • Devendra Fadnavis Maharashtra CM, Contact Number, Email Id & Office Address - धरण कामाविषयी
    Kishor Ramdas Sawant on 2018-05-05 13:51:22

    मा.मुख्य मंत्री महोदय,मी एक सामान्य नागरिक जाणू ईच्छितो की,अमळनेर तालुका,जळगाव जिल्ह्यातील पाडळसे धरणाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबीत कोणत्या तांत्रिक अडचणींमुळे आहे.आणि आपल्या सारख्या विकासाची विशाल दृष्टी असलेल्या जाणत्या राज्यास कोणतीही तांत्रिक अडचण सोडवणे अवघड नाही.साहेब या धरणाचे काम पूर्ण झाले तरअमळनेर,चोपडा,धरणगाव,एरंडोलचा काही भाग,यावलचा काही भाग आर्थात शेकडो खेडी व हजारो शेतकरी सुखी होतील,शेती खर्या अर्थाने सुजलाम सुफलाम होईल.विहीरींची व बोअर वेल्सची खोल गेलेली पाण्याची पातळी वाढेल.अनेक खेड्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल व हे काम आपल्या कारकीर्दीत झाले याची नोंद इतिहासात सुवर्ण अक्षरात कोरली जाईल.म्हणून तमाम तहानलेल्या नागरिकांच्या वकष्टकरी,शेतकरी पुत्रांच्या वतीने विनम्र विनंती करतो की आपण या समेस्येकडे जातीने लक्ष द्याल. आपला...मराठी माणूस