Complaint Article 45

  • Governor of Maharashtra Office Address, Email ID, Contact Number & More - article 45
    SWAMI MOHANDAS on 2021-07-24 09:54:33

    प्रति,
    मा. राज्यपाल, मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई
    विषय-- भारताच्या संविधानानुसार (भाग ४ कलम ३८-५१) कायदे करताना राज्य धोरणांची निदेशक तत्वे लागू करणे महाराष्ट्र सरकारचे कर्तव्य आहे. त्याचे पालन होत नाही. तात्काळ खुलासा करावा.
    राज्य धोरणांची निदेशक तत्वे-- कलम ४५
    राज्य, बालकांसाठी , त्यांच्या वयाची ६ वर्षे पूर्ण होई पर्यंत, प्रारंभिक बाल्यावस्थेतील देखभाल आणि शिक्षण यांची तरतूद करण्या करिता प्रयत्न करील.
    या कलमाचे पालन करण्यासाठी समाजाचे भावनिक प्रबोधन केले पाहिजे. भावना असतील तरच तो मानव आहे. मनुष्यालाच मुलांचे संगोपन करण्याची इच्छा होते, ते प्रबोधन करण्यासाठी मा. राज्यपाल, मा. मुख्यमंत्री, मा. मंत्री, राजकिय पक्षांचे नेते, विरोधी पक्षांचे नेते, सरकारी व्यवस्थेतील आधिकारी, समाज सुधारक, चित्रपट निर्माते, वैद्यकीय तज्ञ मानसिक तज्ञ इत्यादी सर्वांचे मानवते संबंधी प्रबोधन केले पाहिजे. त्यांना उद्देशिकेतील शब्द अन् शब्दाचा अर्थ समजून उमजून सांगितला पाहिजे. समाजव्यवस्था प्रभावीपणे अनुकूलपणे प्रस्थापित करण्यासाठी चित्रपटाचा / घरातील चित्रपट(दूरदर्शन वाहिन्या) उपयोग करून घ्यावा. समाज प्रबोधनासाठी चित्रपट / घरातील चित्रपट(दूरदर्शन वाहिन्या) हे अत्यंत प्रभावी माध्यम आहे. त्याचा योग्य रितीने उपयोग करून घेतला पाहिजे. नागरिकांमध्ये माणुसकी निर्माण होण्यासाठी राज्य सरकारने जागरूकतेने प्रयत्न केले पाहिजेत. जसे आपण आपल्या बाळांचे संगोपन, पालन, पोषण करतो, तसेच आपल्या राज्यातील लहान बाळांचे संगोपन, पालन, पोषण करणे हे सुध्दा सर्व नागरिकांचे कर्तव्य आहे हा व्यापक विचार नागरिकांमध्ये निर्माण करण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी निरोगी व्यक्तिमत्व, वक्तशिरता, पचनक्रिया उत्तम, उत्साही व्यक्तिमत्व, कर्मेंद्रियांची कुशलता, संवेदनशिलता, मनाची एकाग्रता, मनाची व्यापकता, मनाचा विकास, सौजन्यशिलता, भावनिकता, सामाजिक बांधिलकी, विवेक-विकास, आकलन, निरिक्षण, जिज्ञासा, संशोधन, निर्णयक्षमता अशा सद्गुणांची आवश्यकता असते. ते सर्वांगिण व्यक्तिमत्त्व विकासानेच साधते. म्हणून राज्य सरकारने प्रत्येक नागरिकाच्या सर्वांगिण व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रबोधन केले पाहिजे. आपल्या राज्यामध्ये सहा वर्षांपर्यंतच्या बालकांची संख्या किती आहे याचे संशोधन करावे. यामध्ये ज्यांना सरकारची मदत गरजेची आहे, त्यांचाच विचार येथे केला पाहिजे. कारण इतरांची काळजी घेण्यासाठी त्यांचे पालक समर्थ आहेत. लहान मुलांचे आरोग्य, त्यांच्या सकस आहाराची व्यवस्था, त्यांच्या संस्कारांची, शिक्षणाची व्यवस्था इत्यादि साठी निधी किती लागणार याचे नियोजन केले पाहिजे. मुलांच्या पालन-पोषणासाठी प्रशिक्षित स्त्रियांची नेमणूक केली पाहिजे. त्या स्त्रियांच्या प्रबोधनासाठी योग्य संस्कारक्षम व्यक्तींचीच नेमणूक केली पाहिजे.
    असा हा व्यापक विचार सर्वांच्या मनामध्ये रक्ताप्रमाणे पक्का झाला पाहिजे. हेच प्रबोधन राज्य सरकारने केले पाहिजे.
    या सर्व कार्यासाठी, उपक्रमासाठी प्रामाणिक, कार्यक्षम व हुषार व्यक्तींची च नेमणूक केली पाहिजे.

    casteless-india.blogspot.com 29-06-2020 M ARTICLE 45 casteless.india20@gmail.com
    प्रत सविनय सादर— मा. पंतप्रधान, भारत सरकार, नवी दिल्ली (vide PMOPG/E/2020/0618875)